नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा डॉ. सौ. विजया राजेश नंदुरकर (ठाकरे) यांनी आज 29 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच सक्रिय होत शहरातील 'नगरपरिषद लालबहादूर शाळा' आणि 'नगरपरिषद संजना डिजिटल उर्दू उच्च प्राथमिक शाळा' यांना भेट देऊन विशेष पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी केवळ शाळेच्या इमारतीची व परिसराची पाहणी केली नाही, तर शासनाकडून मिळणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेची स्वतः पडताळणी केली.