घराघरात गोडवा परतणार असून तब्बल दीड वर्षानंतर दारव्हा तालुक्यात रेशन दुकानांतून साखरेचे वितरण पुन्हा सुरू होणार आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठी शासकीय गोडावूनमध्ये साखरेचा साठा दाखल झाला असून जानेवारीपासून प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी सत्यवान बांते यांनी शुक्रवारला दुपारी एक वाजता दरम्यान दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून माध्यमांना दिली आहे.