माढा: आ अभिजित पाटील यांनी सीना नदीकाठी केली नुकसानीची पाहणी
Madha, Solapur | Sep 20, 2025 माढा तालुक्यातील सिना नदीला पूर आल्याने पुराचे पाणी पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनास तत्काळ सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश देऊन निमगाव-माढा, दारफळ, राहुलनगर, उंदरगाव- केवड, वाकाव आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची आज पाहणी आ अभिजीत पाटील यांनी केली. यावेळी माढा तहसीलदार संजय भोसले , तालुका कृषी अधिकारी चांदने उपस्थित होते.