चाळीसगाव (प्रतिनिधी): रस्ते अपघातातील जीवितहानी टाळण्यासाठी चाळीसगाव महामार्ग पोलीस केंद्र आणि 'रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स' यांच्या संयुक्त विद्यमाने आज ३१ जानेवारी रोजी विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. या उपक्रमात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचे प्रबोधन करून त्यांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले.