हिंगणघाट विधानसभा श्रेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी आज कोपरा येथे संत फक्कडनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित संगीतमय भागवत सप्ताहात उपस्थित राहून दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. हरिनामाच्या गजरात, भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात भागवत कथेच्या मधुर स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. संत फक्कडनाथ महाराज यांच्या विचारांतून सेवा, सदाचार, समता आणि समाजएकतेचा संदेश अनुभवायला मिळाला असे मत व्यक्त केले.या पवित्र प्रसंगी फक्कडनाथ महाराज देवस्थान सभागृहाचे भुमिपुजन केले