अकोला: पिकेव्ही अकोला येथील माजी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे एमपीकेव्ही राहुरीचे नवे कुलगुरू
Akola, Akola | Dec 1, 2025 राज्यातील कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रात महत्वाची घडामोड घडत असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील माजी संशोधन संचालक डॉ. विलास काशिनाथ खर्चे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. 1983 च्या सुधारीत कृषी विद्यापीठ कायद्यानुसार जाहीर झालेल्या आदेशानुसार ते पाच वर्षे कार्यभार सांभाळणार असून त्यांच्या अनुभवामुळे संशोधन व कृषी शिक्षणाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे प्रसिद्धीपेम