आज दि २७ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली कि कन्नड नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिता काकासाहेब कवडे तसेच शिवसेनेच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. या वेळी खासदार संदीपान भुमरे यांनी जनतेशी संवाद साधत शिवसेनेने केलेल्या जनकल्याणकारी कामांचा सविस्तर आढावा मांडला