राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. लवकरच या कामाची प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राहुरी नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराची सांगता सभा रविवारी सायंकाळी पार पडली. या सभेत पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. शहराच्या आधुनिकीकरणाच्या कामांना गती दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. या प्रसंगी युवा नेते अक्षय कर्डिले यांसह स्थानिक मान्यवर उपस्थित होते.