भंडारा: जिल्हा गारठला! तापमान 9.5°C; चालु वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद, 'शीत लहरी'चा धोका!
भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिनांक १८ नोव्हेंबर रोजी रोजी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात थंडीची लाट तीव्र झाली असून, किमान तापमान ९.५°C (कमाल तापमान २८.२°C) इतके नोंदवले गेले आहे. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात शीत लहर प्रवाहित होण्याचा अंदाज असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील सहा वर्षांतील किमान तापमानाची नोंद विचारात घेतल्यास, २०२१ मध्ये २८/०१/२०२१ रोजी ७°C इतक्या नीचांकी तापमानाची नोंद.