चाळीसगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील गणेशपूर शिवारात मका भरण्यासाठी गेलेल्या टाटा एस (छोटा हत्ती) या मालवाहू वाहनाला अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.