समुद्रपूर: गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाने दुमदुमली गिरड नगरी: संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य दिंडी शोभायात्रा
गिरड :येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या थाटात साजरी करण्यात येते २३ डिसेंबर पासून २८ डिसेंबरपर्यंत याठिकाणी मोठ्या भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले २८ डिसेंबरला गाडगेबाबा मंदिरातून भव्य दिंडी शोभायात्रे आयोजन करण्यात आले होते यावेळी परीसरातील भजन मंडळींनी मोठ्या संख्येने सहभागी होत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गजर केला या दिंडी शोभायात्रेने संपूर्ण गावाचे मार्गक्रमण करीत दिंडीचा समोरोप मंदिरात करण्यात आला