अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंभोरा ठाणे हद्दीतील खुंटेफळ येथे घडली आहे. पुजा असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आत्महत्या का व कोणत्या कारणाने केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील १७वर्षीय अल्पवयीन मुलीने शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान राहत्या घरात कोणी नसल्याचे पाहून गळफास घेतला. याच दरम्यान काही वेळात आई, वडिल घरी येताच त्यांनी तिला खाली घेत उपचारासाठी धानोरा येथील एका खाजगी दवाखान्यात आणले.