अर्जूनी मोरगाव शहर व ग्रामीण भागातील परप्रांतीय व्यापारी तसेच इतर उद्योगधंद्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत समस्त नगरवासी अर्जुनी मोरगाव यांच्या वतीने अश्विनसिंह गौतम, राकेशसिंह राजपुरोहित यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.