5 जानेवारी रोजी फिर्यादी नामे कृष्णकुमार दोनोडे वय 35 वर्ष राहणार घाटटेमनी यांनी तक्रार दिली की 31 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 रोजी रात्री दरम्यान घरासमोरील रोडवर ठेवलेली लाल रंगाची ट्रॅक्टरची ट्रॉली किंमत 1 लाख 30 हजार रुपयाची कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याने फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आमगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात चोरीस गेलेली ट्रॅक्टरची ट्रॉली व अज्ञात आरोपीचा शोध सुरू होता.