महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या आदेशाने रामटेक नगरपरिषद शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी शिवसेनेचे दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक सुमित कोठारी यांची अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 13 जानेवारीला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना प्रतिज्ञापत्र देऊन त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.