आर्णी तालुक्यातील चिखली ई येथे सन 2014 मध्ये मुख्य रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 1 हजार झाडे रोजगार हमी योजने अंतर्गत लावली होती त्याच्यातील 11 वर्षाचे 425 झाडे बेकायदेशीर कत्तल करून परस्पर विक्री सरपंच व सचिवाने केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन देवून चौकशीची मागणी केली आहे निवेदनानुसार, मुख्य रस्त्याच्या दुतर्फा लावलेली ही झाडे भूजल पातळी वाढविण्यास उपयुक्त होती. मात्र सरपंच व ग्रामसेवकांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता झाडे