पुणे शहर: हातात बेड्या, शेजारी पोलीस; आंदेकर जेलमधून थेट निवडणूक कार्यालयात, पुणे महानगरपालिकेची लढवणार निवडणूक
कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबाने महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली आहे. पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.