व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाचे आई-वडिलांशी होणारे सततचे भांडण अखेर एका तरुण जीवाच्या अंताला कारणीभूत ठरले आहे. लाखनी तालुक्यातील मोरगाव/राजेगाव येथील रोहित बाळा भैसारे (वय २७) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. रोहितला दारूचे व्यसन होते, ज्यामुळे घरात नेहमीच कलह निर्माण होत असे. याच वादातून टोकाचे पाऊल उचलत रोहितने २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान घराच्या हॉलमध्ये गळफास घेतला.