आज सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापुर शहरातील प्रसिद्ध जागृत खंडोबा महाराज मंदिरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील खंडोबा महाराजांची मूर्ती चोरून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र मूर्ती मंदिरातून काढून जवळच असलेल्या चहाच्या टपरीच्या काउंटरखाली लपवून ठेवण्यात आली असल्याचे उघड झाले.