हिंगणघाट पंचायत समिती यांच्या वतीने समग्र शिक्षा अभियानांतर्गत समावेशित शिक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले यावेळी आमदार समिर कुणावार म्हणाले की या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासाला बळ मिळावे, त्यांना समान संधी मिळावी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळेल असे मत व्यक्त केले.