सेलू: वडगांव बसस्टॉप जवळ गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यावर सेलू पोलिसांची कारवाई; ५० लिटर गावठी दारूसह आरोपी अटकेत
Seloo, Wardha | Dec 18, 2025 दारूबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सेलू पोलिसांनी गुरुवारी दि. १८ डिसेंबर गुरुवार रोजी वडगांव बसस्टॉप जवळ सकाळी केलेल्या कारवाईत ५० लिटर गावठी मोहा दारू आणि दारू वाहतूक करणारी मोपेड असा एकूण ₹८५,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नशीब रमेश तायडे (वय ३१ वर्षे, रा. गिरोली ढगे, ता. सेलू) या आरोपीस अटक केली आहे. त्याचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये दुपारी २ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी सेलू पोलिसांकडून देण्यात आली.