बँकांनी अधिकाधिक प्रकरणे मंजूर करून जिल्ह्यात उद्योग वाढीस प्रोत्साहन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल भवन येथे जिल्हा अग्रणी बँक यांच्यातर्फे सप्टेंबर २०२५ तिमाही अखेर झालेल्या आर्थिक वर्षातील बँकर्स समीक्षा बैठकीत ते बोलत होते. या आर्थिक वर्षातील सर्व सरकारी प्रोत्साहनपर उपक्रम व प्राथमिक क्षेत्रातील कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी व बँक अधिकारी उपस्थित होते.