चिमुरडी अत्याचार प्रकरणी लिंबागणेश येथे तीव्र निदर्शने करण्यात आले, शेकडो नागरिकांची उपस्थिती
Beed, Beed | Nov 20, 2025 नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिला दगडाने ठेचून निघृणपणे हत्या केल्याच्या भीषण घटनने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे गुरुवार, दि. २० रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.