जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ (ता. आंबेगाव) येथे भारतीय जनता पार्टीने मोठी मोर्चेबांधणी केली आहे. आज पेठ येथे भाजपच्या * मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून, पेठ-घोडेगाव जिल्हा परिषद गटातून आज भाजपचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली