आज शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास रोहा तालुक्यातील चिंचवली येथे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत चिंचवली तर्फे दिवाळी या ग्रामपंचायत कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या आत्मीयतेने माझे स्वागत केले. त्याबद्दल सर्वांचा मी मन:पूर्वक आभारी आहे. या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने उपस्थितांना संबोधित करताना 'रोहा तालुक्यातील प्रत्येक गावांचा विकास करणे हेच माझे प्राधान्य असून येणाऱ्या काळात देखील अनेक कामे पूर्णत्वास न्यायची आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसेच प्रलंबित असलेले शिवसृष्टीचे काम लवकरच पूर्णत्वास येईल, असा विश्वास ग्रामस्थांना दिला.