दौंड: केडगाव-चौफुला परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अटक; यवत पोलीसांची दमदार कारवाई
Daund, Pune | Nov 6, 2025 केडगाव परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी घातक हत्यारे आणि साथीदारांसह अटक केली आहे. ही कारवाई यवत पोलिसांनी केली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.