पळसवाडी परिसरातील शेतशिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतमजूर शेतात जाण्यास नकार देत असून शेतीकामे खोळंबली आहेत.गणेश मालोदे यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने गाईवर हल्ला करत ठार केले होते.यानंतर गावातील विविध ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये दहशत वाढली. सायंकाळी प्रकाश ठेंगडे यांच्या शेतात बैलांवरही हल्ला झाला.