जालना शहरातील जेईएस महाविद्यालय येथे सुरू असलेल्या शाहीरी प्रशिक्षण शिबीराचा शनिवार दि. 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता उत्साहात समारोप करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाच्या वतीने आयोजित या शिबीराचा समारोप विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. समारोप सोहळ्यात प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या शाहीरी, लोककला व सांस्कृतिक कलाविष्काराने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पारंपरिक शाहीरी शैलीतून सामाजिक विषयाची मांडणी केली.