अखिल भारतीय कृषी गोसेवा महासंघाची कारवाई : 10 टन गोमांस भरलेला ट्रक पकडला, चाकूर पोलीसांच्या ताब्यात सुपूर्द. अखिल भारतीय कृषी गोसेवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मोठी धडक कारवाई करत जवळपास 10 टन गोमांसाने भरलेला ट्रक ताब्यात घेत चाकूर पोलिसांच्या हवाली केला. महाराष्ट्रात गोमातेचा "राज्यमाता" म्हणून सन्मान असताना आणि राज्यात गोहत्याबंदी कायदा लागू असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तल होत असल्याचा गंभीर मुद्दा या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आला आहे