पाचोरा: भाजपच्या महारॅलीला प्रचंड जनसमुदाय, मतदारांचा जनसागर लोटला, नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल,
पाचोरा - भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार सुचेताताई दिलीप वाघ व इतर नगरसेवकांचे नामांकन भरण्यासाठी भाजपाने आयोजित केलेल्या महारॅलीला हजारोंच्या संख्येने मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाचोरा शहरात आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता दिसून आले. जिल्हाध्यक्ष राधेश्यामजी चौधरी,माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,युवा नेते अमोल शिंदे, वैशालीताई सूर्यवंशी, माजी गटनेते संजय वाघ यांच्याहस्ते नारळ वाढवून ढोल ताशांच्या गजरात निघाली,