आज दिनांक 14 जानेवारी संध्याकाळी आठ वाजता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरात दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून या घटनेत दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाद नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच यम सिडको पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वाद करणाऱ्या दोन्ही गटांना ताब्यात घेण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी घाटे रुग्णालयात हलवण्यात आले असून परिसरात तणावपूर