राहुरी नगरपालिकेचा निकाल जाहीर झाला असून राहुरीकरांनी पुन्हा एकदा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर विश्वास टाकला आहे. एकूण २५ जागांपैकी प्राजक्त तनपुरे गटाने १७ जागांवर विजय मिळवला, तर भाजपाला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाऊसाहेब मोरे यांनी तब्बल २००० पेक्षा अधिक मतांची आघाडी घेत नगराध्यक्षपद पटकावले. राज्यभराचे लक्ष लागलेल्या या निकालामुळे पुन्हा एकदा राहुरी नगरपालिकेवर तनपुरे गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.