पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या घरघंटी व शिलाई मशीन वाटप उपक्रमाचा पुढील टप्पा आजपासून सुरु झाला. काही दिवसांपूर्वी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. शहरी भागातील प्रभाग १४ ते २० मधील लाभार्थी महिलांना आज मशीनचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत एकूण ४,२५० पात्र महिलांची निवड करण्यात आली आहे.