चिपळुण: साडवली येथे असलेल्या बिबट्या अखेर वन विभागाकडून जेरबंद
आज सकाळी संगमेश्वर तालुक्यातील साडवली कासारवाडी गावात एक बिबट्या अडकल्याने एकच खळबळ उडाली. गावातील रहिवासी राजेंद्र धने यांच्या घरामागे हा बिबट्या अडकला होता. पोलीस पाटलांनी तातडीने वन विभागाला याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि बिबट्याची सुखरूप सुटका केली.