जालना: दि.११/१२/२५ दरवर्षी सिकलसेल जनजागृती सप्ताह 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत सिकलसेल बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने साजरा करण्यात येतो. सिकलसेल अनुवंशिक आजार आहे. सिकलसेल टाळण्यासाठी विवाहपूर्वी सिकलसेलची तपासणी करावी. उद्याची सिकलसेल मुक्त पिढीसाठी ही तपासणी आवश्यक आहे. रक्त तपासणी द्वारे सिकल सेल आजाराची निदान होते. तपासणी करा, जाणून घ्या, सिकलसेल पासून मुक्त राहू या !