समुद्रपूर:रात्री च्या वेळी महिला भावाकडे गेल्याने घराला कुलूप पाहून चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील सोन्याचे दागिने व नगदी १० हजार रु असा २ लाख रु चा माल लंपास केल्याची घटना वार्ड नंबर १३ मधील संगीता हिंगाने याचे कडे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. अंगणवाडी शिक्षिका संगीता मुरलीधर हिंगाने यांच्या मुलाचे लग्न जुळले असल्याने त्यांनी काही सोन्याचे दागिने तयार करून ते घरातील कपाटात ठेवले होते.