नागपूर शहर: गणेश नगर येथे छापा मार कार्यवाही करून प्रतिबंधित मांजा करण्यात आला जप्त ; गुन्हे शाखा युनिट तीन ची कार्यवाही
30 नोव्हेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमालाच मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस ठाणे कपिल नगर हद्दीतील गणेश नगर येथे एका रूमवर छापा मार कार्यवाही करून तब्बल 1548 नायलॉन मांजाच्या चकऱ्या जप्त केल्या आहे. आरोपीकडून मोबाईल व नायलॉन मांजा व मोबाईल असा एकूण 29 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद आतिफ व गुजर अंसारी याला अटक केली आहे आरोपीविरुद्ध कपिल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला