कळमनूरी: कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एकाचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील माधव रामजी भालेराव वय 45 वर्षे यांचा गावातील काही जणा सोबत शेतीचा वाद झाला होता,यामुळे तो दि.27 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठीआला असता,पोलीस तक्रार लिहीत असतानाच त्यांनी खिशातून विषारी औषधाची बॉटल काढून विष पिण्याचा प्रयत्न केला,यावेळी पोलिसांनी त्याची बॉटल बाजूला सारून तात्काळ त्यास कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.