घाटंजी: वन विभागाने थांबविले उत्खनन,कोपरा परिसरात अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त
घाटंजी वनपरिक्षेत्रात कोपरा नियत क्षेत्र राखीव वन कक्ष क्रमांक 531 मध्ये अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करताना वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान दिसून आले. यावरून ट्रॅक्टर ट्रॉली मुरूम व इतर साहित्य जप्त करण्यात आले.ही कारवाई चेतन नेहारे वनपरिक्षेत्र अधिकारी घाटंजी प्रदीप निवल क्षेत्र सहाय्यक वनरक्षक दामोदर नेवारे परमेश्वर आनकाडे पंकज भुसारी प्रकाश मुंडे व वाहन चालक निलेश आगरकर यांनी केली.