श्रीगोंदा हादरले.! आमदार पाचपुते यांच्या गावात ऊसतोड मजुरांवर प्राणघातक हल्ला; महिला आणि मुलांनाही बेदम मारहाण..! सर्व पिडीत दलीत.. आदिवासी समाजातील.. श्रीगोंदा मतदारसंघात एक संतापजनक घटना समोर आली आहे. आमदार पाचपुते यांच्या काष्टी गावाजवळील संतवाडी येथे किरकोळ संशयावरून आदिवासी आणि दलित समाजातील ऊसतोड मजुरांवर जमावाने प्राणघातक हल्ला केला. भीषण हल्ल्यात महिला, लहान मुले आणि बाळंत महिलांसह सुमारे १५ ते २० मजूर गंभीर जखमी झाले आहेत