वणी: भरधाव ट्रकने मोपेड दुचाकीला उडविले, दुचाकीस्वार महिलेचा घटनास्थळीच मृत्यू लालपुलिया येथील घटना
Wani, Yavatmal | Nov 19, 2025 सुसाट ट्रकने मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार 19 नोव्हेंबरला दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास लालपुलिया येथे घडली. नाजनीन फातिमा शेख मकसूद शेख वय अंदाजे 40 वर्षे रा. ख्वाजा नगर लालपुलिया असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.