गोरेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत भाजपाचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे.आज रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मतमोजणीत गोरेगावच्या मतदारांनी सत्ताधाऱ्यांना स्पष्ट इशारा देत काँग्रेसच्या पारड्यात कौल टाकला. केंद्र व राज्यात भाजप महायुतीची सत्ता असतानाही कोरेगाव नगरपंचायतीत मात्र भाजपला जबर धक्का बसला असून ही निवडणूक स्थानिक प्रश्नावर मतदान झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.