समुद्रपूर: गिरड परिसरात धानाच्या १० एकर क्षेत्रात होणार शिंगाड्याची शेती, आत्मा अंतर्गत चंदनखेडा येथे शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा
गिरड भागात चिबाड जमीन क्षेत्रावर शेतकरी धानाची शेती करतात. मात्र जमीन हलकी आणि चिबाड असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. धान शेतीला अधिक उत्पादन देणाऱ्या शिंगाडा शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रनेच्या वतीने गिरड भागात शिंगाडा शेतीसाठी प्रोत्साहन दिल्या जातं आहे. यावर्षी १० एकरात शिंगाड्याची शेती शेतकरी करणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी समुद्रपूर कु. हर्षदा खेकारे यांनी दिली आहे.