दारव्हा तालुक्यातील पेकर्डा शेतशिवारामध्ये वन्य प्राण्यांमुळे रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे या वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशा प्रकारचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते बिमोद मुधाने यांनी दारव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना आज दिनांक 3 जानेवारीला दुपारी चार वाजता दरम्यान दिले आहे.