समुद्रपूर: पिक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड काढा, प्रहारची तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी
समुद्रपूर: विविध राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावुन शेतकऱ्यांचे संपूर्ण बँकेचे व्यवहार बंद केले असल्यामुळे त्याच्या खात्यात जमा झालेले किसान सन्मान योजनेसह इत्तर सरकारी योजनेचे पैसे काढता येत नाही तरी तातडीने अशा शेतकऱ्यांचे होल्ड काढावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी प्रहारचे माजी जिल्हा प्रमुख देवा धोटे,दिनेश भाऊ गलांडे,महेश घुमडे,अंकित दांडेकर,सुधाकर साठवणे,आदी उपस्थित होते.