आज दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास रेल्वे संदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूर सीएसएमटी सकाळची 10:42 ची एसी लोकल दादरला थांबूनही दरवाजे उघडले नाहीत. यामुळे अनेक प्रवासी संतापलेले पहायला मिळाले. दरवाजे उघडले नसल्याने उतरणारे प्रवासी उतरू शकले नाहीत आणि चढणारे प्रवासी चढू शकले नाहीत. रेल्वे प्रशासन झोपेत आहे का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.