आपल्या घराकडे पायी परतणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धाला भरधाव मोटारसायकलने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजेगाव (एम.आय.डी.सी.) येथील पुरुषोत्तम लटारू रामटेके हे दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास एन.एच. ५३ रोडवरून घरी परतत असताना, आरोपी चालक झिंगर मनोहर गोंडाणे याने आपल्या ताब्यातील डिस्कवर मोटारसायकल (क्र. एम.एच. ३६ पी ०९६६) अत्यंत भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून रामटेके यांना पाठीमागून धडक दिली, ज्यामुळे ते गंभीर ज