इंदापूर: माळवाडी परिसरात विद्युत पंपांच्या आतील तांब्याच्या तारांची चोरी
Indapur, Pune | Apr 24, 2024 इंदापूर नजीक असणाऱ्या माळवाडी नंबर २ येथील उजनी काठच्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची तोडफोड करून त्यामधील तांब्याच्या तारा चोरीस जाण्याचा प्रकार मंगळवारी 23 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडलाय.सुमारे अशीच घटना गेले पंधरा दिवसा खाली गलांडवाडी नंबर एक येथे घडली होती असं ही या शेतक-यांचं म्हणण आहे.दादासाहेब पिसे, माधव मोरे, रंगनाथ मेत्रे आणि सचिन मोरे यांच्या मोटारींच्या तोडफोड करुन आतील ताब्याच्या तारा चोरी केल्यात.त्यात त्यांच दीड लाख रुपयांच नुकसान झालयं.