धाकटा खांदा येथील जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष सतिश पाटील यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसीय मोफत शिर्डी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा शुभारंभ पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. सतिश पाटील यांनी प्रभागातील नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत ही मोफत यात्रा आयोजित केली आहे आणि या दोन दिवसीय शिर्डी दर्शन यात्रेचा लाभ ५५० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला असून, नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.