मेलघाटातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिनांक १ डिसेंबर रोजी टेंब्रुसोंडा ते अचलपूर पर्यंत सुंदर व टिकाऊ रस्त्यांसाठी भव्य पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. आज सकाळी १० वाजता ही पदयात्रा अचलपूर उपविभागीय कार्यालयावर पोहचली.या पदयात्रेद्वारे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा निर्धार करण्यात आला असून,संपूर्ण मेलघाटातील जनतेला या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान आयोजनकांकडून करण्यात आले होते.